You are the Best Wife : A True Love Story Book in Marathi, Ajay K Pandey Books, Prem Katha, लव स्टोरी मराठी पुस्तक, Translated on, प्रेमकथा पुस्तके, … बुक, बुक्स, Best Novel, Bestseller Novels





Price: ₹350 - ₹232.00
(as of Mar 05, 2026 13:20:14 UTC – Details)
ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते.
लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं ‘प्रेम करण्याचं’ वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला.
अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.
From the Publisher

ही गोष्ट त्या दोघांची ज्यांचे विचार आणि आदर्शवादी तत्त्व परस्परविरोधी असतात; पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघेही बदलतात, जास्त छान बनतात. जगाकडे बघायची त्यांची दृष्टी एकमेकांमुळे बदलून जाते. दोघे सुखात, आनंदात असतात ; पण दैवाची योजना काही वेगळीच असते.
लेखकाची ही स्वत:ची आत्मकथा आहे. संसाराच्या सुखी प्रवासात प्रिय पत्नीचा हातातला हात अर्ध्यावरच सुटून गेल्यावर एकटं जगताना त्याने आयुष्याशी केलेला संघर्ष यात आहे. सोबत असतात केवळ जाताना तिने तू सर्वोत्तम पती आहेस, हे काढलेले उद्गार. तिचे हे शब्द त्याला बळ पुरवतात. आपलं ‘प्रेम करण्याचं’ वचन ती गेल्यावरही पूर्ण करायला.
अत्यंत प्रामाणिकपणे, विनोदाचा प्रसन्न शिडकावा करत सांगितलेली ही एका उबदार प्रेमाची गोष्ट आहे. तो आणि ती, प्रेमात आलेले सगळे अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू-गोड अनुभवांना कसे सामोरे जातात, अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलाही प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा पक्का होतो.

त्या आठवणी आल्या की अजूनही माझ्यातून एक तीव्र, झोंबणार्या वेदनेची लहर वाहत जाते.
मी फोर्टिसच्या अंतर्गत वैद्यकीय कक्षातील अतिदक्षता विभागात चालत गेलो. माझं हृदय धडधडत होतं आणि मनात भावनांचा कल्लोळ उसळला होता. काही मिनिटांनंतर मी अतिदक्षता विभागाच्या दरवाजाबाहेर उभा होतो; हिरव्या पडद्याच्या मागे भावना होती.
‘‘ऐक, तुला मन शांत ठेवून धैर्याने वागायलाच हवं. भावनाची परिस्थिती अजूनच खालावते आहे आणि आम्ही तिला व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर) ठेवायचा विचार करत आहोत,’’ डॉक्टरांच्या आवाजातून काळजी जाणवत होती, त्यांनी माझ्या हातामध्ये सही करण्याकरिता एक कागद दिला.
मी बधिर झालो. ते बर्फाळ शब्द अणकुचीदारपणे माझ्या आत घुसले, असं वाटलं जणू माझं रक्त गोठत आहे.
‘‘सुधारण्याची आशा कितपत आहे?’’ मी थेट स्पष्टच विचारलं.
‘‘दुर्मीळ आहे, एकदा तिला बरं वाटलं की आम्ही हे सगळं काढून टाकू; पण तिची अवस्था खूपच बिकट आहे. व्हेंटिलेटरची काही अडचण येणार नाही; पण त्यातून जंतुसंसर्ग होऊ शकतो.’’
‘‘म्हणजे, अजून ती व्हेंटिलेटरवर नाही का?’’ मी विचारलं. ‘‘मी बघू शकतो का तिला?’’
‘‘त्याकरताच मी तुला बोलावून घेतलं. हा व्हेंटिलेटर आम्ही तिची परिस्थिती सुधारायला लागली किंवा तशी काही चिन्हं दिसायला लागली तरच काढू शकतो. तिला भूल दिली जाईल त्यामुळे तिची शुद्ध हरपेल म्हणजे मग व्हेंटिलेटरमुळे काही दुखापत होणार नाही.’’
‘‘आणि जर सुधारण्याची काहीच चिन्हं दिसली नाहीत तर?’’ मी विचारलं.
‘‘मग, मला माफ कर…’’ त्यांनी सुस्कारा सोडला. ‘‘तुझं तिच्याशी होणारं हे बोलणं शेवटचं ठरण्याची शक्यता आहे.’’
मी हिरव्या पडद्याच्या मागे गेलो. मला वाटलं होतं तिला मिठीत घ्यावं; पण त्यामुळे काहीतरी बिघडलं आहे असं तिला वाटलं असतं आणि मग तिचा धीर पूर्णच खचला असता. अशा द्विधा मन:स्थितीत आणि जड हृदयाने मी तिच्यापाशी गेलो. तिच्या ओठांभोवती रक्त होते, तोंड उघडं ठेवून ती पडली होती आणि तिचे डोळे बंद होते. तो माझ्या आयुष्यातला सर्वांत भयंकर क्षण होता. श्वास घेताना तिची जी धडपड चालली होती ती बघताना मला वेड्यासारखं झालं. माझे श्वास तिला द्यावेत, माझं आयुष्य तोडून तिला द्यावं असं वाटलं; पण मी असहाय होतो. इतकं हताश मला आधी कधीही वाटलेलं नव्हतं.
मोठ्या प्रयासाने माझ्या तोंडून शब्द उमटले, ‘‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, भावना. जगातली सर्वोत्तम पत्नी आहेस तू.’’
आपली सगळी शक्ती एकवटून ती तुटक श्वासांच्या दरम्यान अस्फुटपणे काहीतरी बोलली.
त्या दिवसापासून माझं आयुष्यच बदलून गेलं. याआधीचं माझं आयुष्य आणि नंतर हे बदललेलं आयुष्य यादरम्यान असं काहीतरी होतं ज्याने हे पुस्तक लिहायला मला भाग पाडलं. मला तीव्र इच्छा होते की, काळाचे काटे उलटे फिरवावेत, मागच्या दिवसांमध्ये जावं आणि आम्ही दोघांनी जो बहारदार काळ एकत्र घालवला त्यातले
सुंदर क्षण पुन्हा जगावेत.

माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? मी पैसे का मिळवतो आहे? आनंदाचं खरं कारण काय असतं? मला अजून जास्त पैसे मिळवायचे आहेत का? पण कोणाकरिता? आयुष्य बेभरवशी आहे. मी जर उद्या मेलो तर काय होईल? मी न वापरलेल्या पैशांचं काय होईल? तिच्यासारखीच्या बाबतीतच हे का घडलं? हे प्रश्न माझं मन पोखरत होते. माझा माझ्या नोकरीतला, पैसे मिळवण्यातला रस निघून गेला आणि मी निष्कर्ष काढला की खरा आनंद हा पैशांच्या श्रीमंतीमधून मिळत नाही. माझ्या आयुष्याचं खरं प्रयोजन काय आहे याचा मी शोध घ्यायला सुरुवात केली.
एक दिवस मी कॅनॉट प्लेसला कारमधून जात होतो. सामान्य दिवस होता तो. दिल्लीची हवा कुंद आणि अतिशय गरम होती. आयटीओ दुभाजकाच्या जवळ लाल सिग्नल लागला म्हणून मी कार थांबवली. उजव्या बाजूला, मला एक मध्यमवयीन माणूस सायकलवरून दोन लहान मुलांना मागे बसवून घेऊन चालला होता. एक पाच वर्षांचा वाटत होता आणि दुसरा साधारण दोन वर्षांचा. सायकल चालवणारा माणूस त्या गरीब बिचार्या मुलांचा बाप असावा. त्या दोघा मुलांना एका लहान दोरीने बांधून ठेवले होते, म्हणजे तो सायकल चालवत असताना ती मुलं तोल जाऊन पडणार नाहीत. मी माझा चेहरा त्यांच्या दिशेने वळवला आणि त्यांच्याकडे पाहून मी हसलो; पण उत्तरादाखल ते हसले नाहीत. खिडकीची काच खाली करून मी त्यांच्या दिशेने हात हलवला, त्यांचं लक्ष वेधलं जावं म्हणून. मोठ्या मुलाने हसून हात हलवला; पण लहान मुलाने दुर्लक्ष केलं. वाहतूक सिग्नलवरच्या टाइमरवर 72 सेकंद दिसत होते, हिरवा सिग्नल पडायला अजून वेळ होता. मला माहीत नाही का; पण त्या लहान मुलाला हसताना बघायची मला तीव्र इच्छा झाली होती. आधी, माझ्या मनात आलं त्याला काही पैशांची नाणी द्यावीत; पण मुलांना काय उपयोग पैशांचा आणि त्यांच्या वडिलांना ते अपमानास्पद वाटू शकलं असतं. मी अजून काहीतरी शोधायला लागलो; पण जवळपास तसं काहीच दिसेना.
टायमरवर आता31 सेकंद शिल्लक असल्याचं दिसत होतं. मी कारचा हातमोजे ठेवण्याचा कप्पा उघडला, तिथे शोधाशोध केली आणि मला तिथे मेन्टॉस गोळ्यांचा डबा मिळाला. मला आश्चर्य वाटलं, कळेना हा तिथे कुठून आला; पण मग मला आठवलं की नन्हूने तो मला दिला होता, त्याच्या मावशीला देण्याकरिता. अजून उशीर न करता, मी तो डबा त्या लहान मुलाच्या हातात दिला. दोघांनाही अतिशय आनंद झालेला दिसला. दरम्यान, हिरवा सिग्नल पडला आणि मी पहिला गिअर टाकला. तो लहान मुलगा माझ्याकडे बघून हसला, त्याने हातही हलवला आणि मोठा मुलगाही त्याला सामील झाला. मीसुद्धा त्यांच्याकडे पाहून हात हलवला.
मला हसू येत होतं आणि एक विलक्षण हलकेपणा जाणवत होता. असं वाटत होतं जणू मी त्यांच्या हातात चंद्र सोपवला होता. सहा महिन्यांची वेदना, व्याकूळता आणि दु:खानंतर आज प्रथमच माझा अंतरात्मा आनंदी झाला होता. माझ्या नसांमधून खुशीची लहर जात असल्याचं मला जाणवलं आणि हृदयापासून होणारा आनंद म्हणजे हाच याची मला खात्री पटली. आयुष्य जगायला काहीतरी प्रेरणा शोधण्याचा माझा दीर्घ प्रयास चालू होता आणि आता अखेरीस मला जगण्याचा एक अर्थपूर्ण धडा त्या दोन लहान मुलांकडून शिकायला मिळाला. माझ्याकरिता ते खरेखुरे प्रेरणादायी गुरू ठरले होते.
माझ्या गालांवरून अश्रू वाहत होते, आणि मी म्हणालो, ‘‘मला ते गवसलं आहे भावना. आयुष्याचा खरा आनंद इतरांना मदत करण्यात आहे हे ज्ञान मला गवसलं आहे.’’
Book Review…
“भावनाच्या अखेरच्या शब्दांनी अजयला बळ पुरवले, आपल्या प्रेमाच्या वचनपूर्तीकरता त्याने जगण्याचा निश्चय केला. ”
– बिझनेस स्टॅन्डर्ड
आपली वेदना त्याने लिखाणावर केंद्रित केली. परिणाम ? दोन बेस्टसेलर कादंबऱ्या, ‘यू आर द बेस्ट वाइफ’ आणि ‘हर लास्ट विश, दोन्ही खऱ्या प्रेम कहाणीवर आधारित आहेत. ‘
– द एशियन एज
“एकाकीपणावर कशी मात केली हे सांगणारं, आत्मचरित्राच्या जवळ जाणारं रंजक असं पुस्तक.”
– मिड-डे
“वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधांमध्ये जे कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.”
– डेक्कन क्रॉनिकल
पांडे यांनी भारतातील पुस्तकविक्रीच्या उच्चांकामध्ये जे.के. रोलिंग आणि देवदत्त पटनाईक यांनाही मागे टाकले आहे.”
– मिड-डे
“अद्भुत प्रणयकथा रेखाटणाऱ्या पुस्तकांच्या वरच्या फळीत अजय पांडे स्थानापन्न.”
– क्वार्झ इंडिया
“ही खरीखुरी प्रेमकहाणी तुम्हाला भावनांच्या वेगवान प्रवाहात ओढून नेईल. ”
– दै. जागरन
“काही पुस्तकं केवळ गोष्ट सांगत नाहीत, वास्तव आयुष्याचं त्यात दर्शन घडतं. यू आर द बेस्ट वाइफ हे अशा पुस्तकांपैकी आहे.”
– रायटर्समेलन
“एका भारतीय लेखकाने याची ग्वाही दिली आहे की भारत केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातच अग्रेसर नाही, तर वाङ्मयीन क्षेत्रातही पुढे आहे. ”
– द ट्रुथ इंडिया
“सुंदर मनाच्या आणि प्रेमळ हृदयाच्या भावनाने अजयला निर्धाराने संकटांचा सामना करायची प्रेरणा दिली, जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला शिकवले.”
– इंडिया कॅफे २४
“मी आजवर वाचलेल्या प्रेमकथांपैकी ही सर्वांत शुद्ध, उबदार अशी प्रेमकहाणी आहे…”
– सॅलिसऑनलाइन.इन

अजय पांडे
अजय पांडे रिहांदनगरच्या एनटीपीसी या मध्यममार्गी वसाहतीमध्ये मोठी स्वप्न उराशी बाळगत मोठा झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याने अलाहाबादच्या आयईआरटीमधून पूर्ण केलं आणि पुण्याच्या आयआयएममधून एमबीए केलं. त्यानंतर त्याला कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. आता सध्या तो कॉग्निझन्ट, पुणे येथे नोकरी करत आहे. त्याचं स्वप्न होतं शिक्षक बनायचं; परंतु दैवाने त्याला आयटी क्षेत्रात आणून सोडलं. प्रवास करणे, ट्रेकिंग करणे, वाचन हे त्याचे छंद आहेत. विविध ठिकाणी केलेल्या प्रवासातून त्याची ओळख विविध संस्कृती, लोकांशी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारची आयुष्य जगणारी लोक परस्परांशी एका अनाकलनीय बंधाने कशी जोडलेली राहतात, याचं कुतूहल त्याच्या मनात निर्माण झालं. ट्रेकिंगने त्याला जगण्यातली आव्हानं पेलायला शिकवलं, खेळांची आवड लागली. पुस्तक वाचनामुळे आयुष्य जगण्याची प्रेरणा जिवंत राहते असं त्याला वाटतं. यू आर द बेस्ट वाइफ ही त्याने लिहिलेली पहिली कादंबरी, आपल्या आयुष्यातल्या सत्य घटना आणि जगण्यातून शिकलेले धडे त्याने यातून मांडले आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.
Publication date : 22 April 2023
Edition : First Edition
Language : Marathi
Print length : 272 pages
ISBN-10 : 9352203763
ISBN-13 : 978-9352203765
Item Weight : 290 g
Dimensions : 20.3 x 4.7 x 25.4 cm
Country of Origin : India
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
Best Sellers Rank: #131,262 in Books (See Top 100 in Books) #2,879 in Indian Writing (Books)
Customer Reviews: 4.2 4.2 out of 5 stars (14) var dpAcrHasRegisteredArcLinkClickAction; P.when(‘A’, ‘ready’).execute(function(A) { if (dpAcrHasRegisteredArcLinkClickAction !== true) { dpAcrHasRegisteredArcLinkClickAction = true; A.declarative( ‘acrLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault”: true }, function (event) { if (window.ue) { ue.count(“acrLinkClickCount”, (ue.count(“acrLinkClickCount”) || 0) + 1); } } ); } }); P.when(‘A’, ‘cf’).execute(function(A) { A.declarative(‘acrStarsLink-click-metrics’, ‘click’, { “allowLinkDefault” : true }, function(event){ if(window.ue) { ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”, (ue.count(“acrStarsLinkWithPopoverClickCount”) || 0) + 1); } }); });
Add a review
Your email address will not be published. Required fields are marked *